: एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजगृह नगरातील देहव्यापाऱ्याच्या अड्ड्याचा भंडाफोड करत पोलिसांनी सूत्रधार महिलेला अटक केली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.राजगृह नगरातील शेगावकर ले-आऊट येथील लोकमान्यनगर मेट्रो स्थानकाजवळ राहणारी ममता पांडे नावाची महिला तिच्याच घरी देहव्यापाऱ्याचा अड्डा चालवत होती. गरीब मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ती देहव्यापार करवून घेत होती.