Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
आज दिनांक 24 ऑगस्ट दुपारी तीन वाजता भारतीय जनता पार्टीचे खासदार भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवसेना ठाकरे गटाचे रतन कुमार साबळे यांनी कमळ हातामध्ये घेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचा समजले जात आहे. भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे आणि खासदार भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत साबळे यांनी भाजपात प्रवेश केला आहे