हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कार्यवाही करीत २ लाख १४ हजार १३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत दोन आरोपींना अटक केली आहे. कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक,सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उपनिरीक्षक प्रकाश लसुंते,अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अखिल इंगळे, अभिषेक नाईक यांनी केली.