सावरोली परिसरात अज्ञात चोरट्यांनी कंपनीतील 27 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अंधेरी येथून दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून कंपनीतून चोरीला गेलेला 27 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.