पारधी समाजाच्या व्यक्तीने जर गुन्हा केला असेल, तर त्यांनी पोलिसांना सहकार्य करायला हवे, गोळीवाराची घटना चुकीची आहे, या संदर्भात चौकशी व्हावी, या घटनेत पारधी समाजाला न्याय मिळावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष व दलित महासंघाच्या वतीने, आज सोमवार दिनांक 01 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता, पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले, यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमाकांत साठे उपस्थित होते.