गडचिरोली शहरातील इंदिरानगर येथे वास्तव्य करीत असलेले. शहरातील एका हार्डवेअर दुकानात मजुरीचे काम करणारे सोमेश्वर नागोसे वय वर्ष 35 यां एका कष्टकरी, कामगार मुलाचा स्कूल व्हॅनच्या जोराच्या धडकेने अपघाती निधन झाले.गडचिरोली जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने इंदिरा गांधी चौकात, सोमेश्वर नागोसे यांना पोस्टररुपी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोमेश्वर नागोसे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्यायची व आर्थिक नुकसान भरपाईची मागणी कामगार संघटनेच्या वतिने करण्यात आली.