कोंढवा परिसरात असणाऱ्या एका महाविद्यालयात निकाल पाहण्याच्या वादातून 10 ते 15जणांच्या टोळक्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इरफान मोहम्मद हुसेन करणूल यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तक्रार दाखल करण्यात आली आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे.