आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पात्राने शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर वरील जमिनीचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर निमगाव येथून वाहणारी पूर्णा नदी दुधडी भरून जाफराबादच्या दिशेने वाहत आहे त्यामुळे निमगाव येथील शेतकरी यांच्या नदीच्या काठावर असलेल्या शेतजमिनी पूर्णता वाहून गेल्या असून यात शेकडो हेक्टर वरील कपाशीचे नुकसान झाले आहे.