रत्नागिरीचे भुषण मानले जाणाऱ्या टिळक आळीतल्या गणेश मंडळाला भेट देत भाजप नेते विशाल परब यांनी कार्यकर्त्यांसोबत आज दर्शन घेतले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत गणेशाचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले. शेतकऱ्यांच्या शेतात चांगले पीक होऊ दे आणि शासनाच्या योजना जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू दे. अशी गणपती बाप्पांकडे प्रार्थना केली. अशी माहिती सावंतवाडीतील भाजपाने ते विशाल परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.