सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे पिकअप वाहन मागे घेताना १४ महिन्यांचा चिमुकला मागच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला. त्याचा सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.७) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शौर्य शरद फुले वय १४ महिने, असं मृत मुलाचं नाव आहे.