वर्धा जिल्ह्यात महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली या वर्षीच्या सजावटीत आणि देखाव्यांमध्ये विविधता दिसून येते काही ठिकाणी गायी आणि वासरांचे मनमोहक देखावे तयार करण्यात आले ,हे सर्व देखावे खरोखरच डोळ्यांना सुख देणारे आणि मन मोहून टाकणारे आहेत.महालक्ष्मी पूजनाची ही परंपरा दोन दिवसांची असते. मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते. आज,1सप्टेंबर रोजी म्हणजेच दुसऱ्या दिवशी,सायं 7 वा महालक्ष्मीला गोड पदार्थांचा नैवेद्य(भोज) अर्पण केला जातो.