रातचांदणा गावात आज शेतकरी चळवळीचा शुभारंभ झाला.गावातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी,कापूस आयात शुल्क,ई-पीक पाहणी,कर्जमुक्त शेतकरी,किसान ऍप सुधारणा,कापूस व सोयाबीनला योग्य भाव अशा महत्त्वाच्या मागण्यांवर ठोस भूमिका घेतली.या मागण्यांसाठी उद्या (१२ सप्टेंबर) शेतकरी चळवळीच्या नेतृत्वाखाली संविधान चौक,यवतमाळ येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.