चाळीसगाव : आगामी सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून आज, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत चाळीसगाव शहरात दंगा नियंत्रण (Riot Control) योजना राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार, ही योजना अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.