उदगीर शहरात २० कोटी रुपये खर्च करून एक भव्य दिव्य असा विश्वशांती बौध्द विहार तळवेस येथे उभारण्यात आला,या बौद्ध विहाराचे लोकार्पण मोठ्या थाटात देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पार पडले,परंतु या बौद्ध विहाराचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बौध्द विहाराच्या घुमट मधून पाण्याची गळती होत आहे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधितावर कार्यवाही करावी करून बौद्ध विहाराच्या बांधकामाची सखोल चौकशी करण्याची मागणी समाज बांधवांकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.