राजापूर तालुक्यातील रानतळे येथील पोल्ट्री फार्म जवळ आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोकाट गुरांमुळे भीषण अपघात घडला. बारसू येथील युवा ठेकेदार दीप्तेश कदम यांच्या चारचाकी वाहनाला रस्त्यावर आलेल्या गुरांमुळे जोरदार धडक बसली. या धडकेनंतर गाडी पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला गेली. सुदैवाने वाहनचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांनी सीटबेल्टचा वापर केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र या अपघातात एक म्हैस जागीच ठार झाली असून दुसरे जनावर गंभीर जखमी झाले आहे.