हिंगणघाट :अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन राज्य सरकारने काढलेला मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. वर्धा जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष कविता मुंगले यांनी म्हटले की, ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशे पेक्षा अधिक जाती असून त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही.अशा परिस्थितीत आणखी एक मोठा वर्ग या प्रवर्गात सामील करणे हे मूळ ओबीसी समाजावर अन्याय करणारे ठरेल.