करमाळ्यात राजकीय वैमनस्यातून धमकीप्रकरण झाले आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप व माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांना शिंदेसेनेत प्रवेश दिल्याचा राग मनात धरून दिग्विजय बागल यांनी जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांना खडकी येथे उघड धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे पूरग्रस्तांची पाहणी करत असताना ही घटना घडली. यावर करमाळा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सहा. पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के यांच्याकडे सोपवला आहे.