ट्रक रिव्हर्स घेताना दुचाकीधारकाला धडक दिल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे घडली आहे. या घटनेत दुचाकीधारक गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती दि. २३ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.