घरगुती भांडणाच्या कारणावरून आरोपी जयंत नाटेकर यांनी त्याची पत्नी मंजुषा नाटेकर व तिचा मामा अशोक काटे यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना 5 फेब्रुवारी 2020 रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती सर्व पुराव्या अंति आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला 29 ऑगस्टला जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी कलम 302 भादवी मध्ये हा जन्म कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.