सांगोला तालुक्यातील गळवेवाडी येथे शेतीला पाणी देण्याच्या हिश्यावरून दिर कोंडिबा तुकाराम गळवे यांच्यासह मुले, सुना यांनी अनिता जगन्नाथ गळवे (वय ५५) यांना काठी व कोयत्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी दीर कोंडिबा गळवे, मुलगा सुनील गळवे, प्रवीण गळवे, ज्ञानेश्वर गळवे व त्यांच्या पत्नी यांच्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.