छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे यांनी आपल्या मूळ गावी पैठण तालुक्यातील पाचोड येथे पोळा सण उत्साहात साजरा केला यावेळी पारंपरिक परंपरेनुसार गावातील वेशी मध्ये रंगबेरंगी बेगड बाशिंग व सजावटीने सजलेल्या बैलांची मिरवणूकीत त्यांनी सहभाग घेतला तसेच गावातील विविध शेतकऱ्यांच्या काढण्यात आलेल्या बैलांच्या मिरवणुकीतही त्यांनी सहभाग घेत लोकांना पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिरवणुकीनंतर पारंपरिक पद्धतीने बैलांना पुरणपोळीचे नैवेद्य भरवले व कुटुंबियासह बैल पूजन केले