वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात आज झालेल्या लिलावात या सगळ्या वस्तूंच्या दराने सगळे विक्रम मोडीत नवा उच्चांक प्रस्थापित केला. या मंदिरात श्रद्धेतून झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला तब्बल वीस हजार रुपये इतका दर मिळाला. तर मानाचा नारळ तब्बल ४१ हजार रुपयांना खरेदी करण्यात आला.