परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येथील पथ्रोट गावात अनैतिक संबंधातून झालेल्या कौटुंबिक वादाचा शेवट खुनात झाला आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मृताचे नाव अरविंद सुरतणे (३२, रा. पथ्रोट) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अरविंदची पत्नी ज्योत्सना (२७) हिचे पथ्रोट येथील अमित लवकुश मिश्रा (३३) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधाची माहिती अरविंदला मिळाली होती. त्याने पत्नीला समजावण्याचा प्