तांबापुरा भागात एका प्रौढ व्यक्तीच्या बंद घरातून चोरट्याने 24 हजार 500 रुपयांची भांडी आणि इलेक्ट्रिक मोटर चोरून नेल्याची घटना घडली आहे. अखिल शेख इनायत (वय 44, रा. तांबापुरा, जळगाव) यांच्या घरात ही चोरी झाली असून, 17 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.