जांब मार्गावरील टी डब्ल्यू जे असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या वित्तीय संस्थेने मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकिस आणला आहे. गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची तीन कोटी 31 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे या प्रकरणात समोर आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून यवतमाळ न्यायालयाने 9 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सागर मंचलवार आणि सुरज मडगुलवार अशी आरोपींची नावे आहे.