मिरज तालुक्यातील बेळंकी ते जानराववाडी रोडवर जानराववाडी गावच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अशोक लेलँड कंपनीचा टँकर (क्र. के ए 28C 1839) हा भरधाव वेगाने जात असताना अचानक तोल जाऊन पलटी झाला. हा अपघात जानराव वाडी गावच्या हद्दीत शिवाजी तुपे यांच्या शेताशेजारी घडला.टँकर उलटल्यानंतर त्यातील ऑइल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडल्याने रस्त्याचे व शेजारील शेताचे नुकसान झाले असून टँकरलाही मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण