राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मनमानी कारभाराविरोधात महिला संघर्ष समिती जांभळीच्या वतीने रुग्णालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. प्रसंगी रुग्णालयातील कामकाजाविषयी तसेच येथील डॉक्टरांच्या उपस्थिती विषयी आंदोलनकर्ता महिलांनी काही आरोप केले आहेत. वर्षा बाचकर, स्नेहल दिवे, सावित्रीबाई बाचक आदींसह महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.