विनापरवाना क्षमतेपेक्षा अधिक जनावरांची दाटीवाटीने व निर्दयीपणे वाहतूक करताना नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी टेम्पो पकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत २० वासरांची सुटका करण्यात आली असून १० लाखांचा टेम्पो जप्त केला. ही कारवाई गुरुवारी पहाटे २:३०च्या सुमारास सांगोला ते कडलास जाणाऱ्या रस्त्यावर केली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सद्दाम नदाफ यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी आदित्य संजय भालसिंह व निरंजन संजयभालसिंह दोघेही रा. वाळकी, जि. अहिल्यानगर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.