सोशल मीडियावर आलेल्या संशयास्पद लिंक वर क्लिक केल्याने आटपाडी तालुक्यातील खातेदाराला व्हाट्सअप बँकेच्या नावाने आलेल्या संदेशामुळे आर्थिक नुकसान झाले आहे सायबर शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तालुक्यातील बँक ग्राहकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे झरे तालुका आटपाडी येथील रोहित संजय सुतार यांना व्हाट्सअप वर बँकेच्या नावाने एक संदेश प्राप्त झाला हा मेसेज खरा असल्याचा समज झाल्याने त्यांनी लिंक उघडली काही क्षणातच त्यांच्या मोबाईल बँक खात्यातून ९४ हजार रुपये गायब झाले