वाशिम शहराच्या बाहेरून जाणाऱ्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाला बायपास देण्यात आला आहे त्यासाठी केकत उमरा रस्त्यावर नागरिकाच्या सुविधेसाठी उड्डाणपूल करण्यात आला असून हा उड्डाणपुलाखालील रस्ता नागरिकांना असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या उड्डाणपुलाच्या खालच्या रस्त्याचे काम करताना योग्य प्रकारे पाण्याची विल्हेवाट न लावल्यामुळे दिनांक एक सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने या उड्डाणपुलाखाली पाणी साचलेले या पाण्यातूनच केकतउमरा कडे जाणाऱ्या वाहनधारकाना त्रास.