मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण असा अपघात घडला आहे. आंबोली नजीक अज्ञात मालवाहू वाहनाने कारला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले. आहेत. निलीवेन सोलंकी असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहे.