कोल्हापूर ते नागपूर या रेल्वे प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेऊन एका प्रवाशाची सोन्या-चांदीचे दागदागिणे असणारी बॅग लंपास केली. त्या बॅगेत 14 लाख 1 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणात गणेश शांतीलाल राठी या प्रवाशाने पूर्णा लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.अशी माहीती आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता मिळाली.