अक्कलकोट तालुक्यातील मौजे हालचिंचोळी येथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याची पाहणी रविवारी दुपारी 12 वाजता करण्यात आली. या वेळी निवासी नायब तहसीलदार डी. एफ. गायकवाड, पाटबंधारे खात्याचे संबंधीत अधिकारी, नगरपरिषद अक्कलकोटचे अधिकारी, मंडळ अधिकारी जेऊर भासगी तसेच ग्राम महसूल अधिकारी सागर सोनवणे उपस्थित होते. या पाहणी दरम्यान तलावाच्या पाणीसाठ्याची स्थिती, सुरक्षितता तसेच गावकऱ्यांच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला.