शहरात आज श्री गणेश विसर्जन सोहळ्याची सुरुवात धार्मिक वातावरणात, ढोल-ताशांच्या गजरात व भक्तिमय जल्लोषात झाली. या सोहळ्याचे उद्घाटन खासदार संजय देशमुख यांच्या शुभहस्ते मानाचा गणपती शिवशंकर गणेश मंडळ यांची पारंपरिक पद्धतीने सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधी व भाविकांच्या उपस्थितीत खासदारांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला माल्यार्पण करून व गणरायांची पूजाअर्चा करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला.