4 सप्टेंबरला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन हुडकेश्वर अंतर्गत येणाऱ्या विनायक नगर येथे महिला स्वतःच्याच घरी देह व्यापार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून एका पिडीतला रेस्क्यू केला. या प्रकरणी लक्ष्मी हटवार नामक महिलेला अटक करण्यात आली असून घटनास्थळावरून 23 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.