आज मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी आमदार अरुण पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा महायुती सरकारच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रावेर तालुक्यातील विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला. नवप्रवेशितांचे स्वागत करताना आमदार अमोल जावळे आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.