ओबीसींच्या मुला मुलींना फायदे मिळत नाहीत. त्यासाठी निधी उपलब्ध केला जात नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी मांडलेली भूमिका ती योग्य असून त्यांनी ती मांडली पाहिजे. शासनाने त्यांना आश्वासन दिले आहे. सरकार त्यांना फसवत आहे इथपर्यंत ठीक आहे पण ओबीसी समाजाला मिळालेले आहे असे सांगून ओबीसी समाजाच्या लोकांमध्ये गैरसमज करू नका एवढे आमची त्यांना विनंती राहील. मराठा समाजाचे आंदोलनाला आमच्या संपूर्ण पाठिंबा असल्याचे मत आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.