27 ऑगस्टला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार अजनी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान कुकडे ले आउट येथून हद्दपार आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव रितेश गवई असे सांगण्यात आले आहे. आरोपीला शहरातून दोन वर्षासाठी हद्दपार केले होते आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अजनी पोलीस करीत आहे.