दापोली तालुक्यातील प्रसिद्ध कर्दे समुद्रकिनारी पुन्हा एकदा पर्यटकांच्या बेफाम कृत्याचा थरार समोर आला आहे. काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास समुद्रकिनारी भरधाव वेगाने थार गाडी चालविण्याचा प्रकार घडला. गाडीचालकाचा ताबा सुटल्याने थार गाडी अचानक उलटली आणि या प्रकाराची संपूर्ण दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहेत. गुरुवार 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. समुद्रकिनारी वाहनांना अशा पद्धतीने वेगाने चालविणे हे केवळ बेकायदेशीर आहे