धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दुरक्षेत्र येथे चौकशीसाठी बोलविण्यात आलेल्या पाच जणांनी पोलीस ठाण्याच्या आवारात एकमेकांशी भांडण करून हाणामारी व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून सोमवारी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.