पाथर्डी कोरडगाव या राष्ट्रीय महामार्गावर सत्यभामा पेट्रोल पंपासमोर सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता अपघात घडला असून भरधाव स्विफ्ट कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. शंकर रंजीत बोरुडे वय वर्ष 43, राहणार बोरुडे वस्ती, दुले चांदगाव रस्ता, पाथरडी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शंकर बोरुडे हे कोरडगाव रस्त्यावरील विजय लॉन्स शेजारील आपलं हॉटेल बंद करून दुचाकीवरून घरी जात होते. पाथर्डीकडून येणाऱ्या स्विफ्ट कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.