बार्शी तालुक्यातील कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अन्नत्याग व आमरण उपोषण उपोषणकर्ते कृष्णा सुनील साळुंखे यांनी गेल्या आठवड्यापासून सोलापूर शहरातील पुनम गेट येथे उपोषणाला बसले होते. अखेर त्यांच्या या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून दत्ता सुरवसे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषणकर्ते सुनील साळुंखे यांनी उपोषण सोडला आहे. एका चिमुकलीच्या हातात प्रमाणपत्र देऊन कोळी महादेव समाजाने जल्लोष साजरा केला आहे.