सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शुक्रवारी सायं 5 वाजता नागरिकांना आवाहन केले की, “गणेशोत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घ्या.” ते पुढे म्हणाले की, उत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा प्रतीक आहे. मात्र, जास्त डेसिबलचा आवाज टाळून, कायद्याचे पालन करून व शांततेत गणेशोत्सव साजरा करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.