संगमनेर हादरलं : दोन चुलत बहिणींनी गळफास लावून जीवनयात्रा संपवली संगमनेर तालुक्यातून आज सकाळी नऊ वाजता एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साखर पठार परिसरातील साकुर येथील बंद घरात दोन चुलत बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तन्वी अजय सगळगिळे आणि मानसी राजेंद्र सगळगिळे अशी मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.