दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एमसीपी शाळा गोरेगाव च्या वतीने भुसारी तुला येथे 350 हून अधिक विविध प्रजातीची झाडे लावून वृक्षारोपणाचा महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच मायाताई राऊत, ग्रामपंचायत सदस्य रवी कापगते, योगेश मेश्राम, मनीष सोनवणे, अर्चना राऊत , ममता राऊत, प्रतिमा खोब्रागडे ,ग्रामसेवक रवींद्र बोरकर, रोजगार सेवक भुमेश्वर वैद्य, एम सी पी शाळेचे अरुण चन्ने, आदी उपस्थित होते.