गणेशोत्सवाच्या अनुषंगाने टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील २९४ व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. या वर्षीचे गणेशोत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडावा यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील यापूर्वी ज्यांच्यावर गणेश उत्सवाच्या काळात किंवा इतर उत्सवाच्या काळात गुन्हे दाखल आहेत अशा इस्मविरुद्ध तसेच जे इसम वारंवार गुन्हे करतात, गावात गुंडगिरी करतात अशा इसमाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.