पालघर जिल्ह्यातील गोऱ्हे येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कुस्ती स्पर्धेस विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आयोजन कमिटीच्या वतीने आमदार भुसार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुस्तीपटू व नागरिकांना मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने नागरिक, कुस्तीप्रेमी यावेळी उपस्थित होते.