वसई येथे एका रिक्षाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. बापूजी पवार यांनी त्यांची रिक्षा मालवणी हॉटेल समोरील परिसरात पार्क करून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची रिक्षा चोरली आणि चोरटा पसार झाला. या प्रकरणी पवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात वसई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.