शेळगाव-आटोळ अंचरवाडी रस्त्यालगतच्या शेतात दिवसाढवळ्या काळवीटाची बेकायदेशीर शिकार करून त्याचे मांस विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वन विभागाने धाड टाकून एक जिवंत काळवीट, मोठ्या प्रमाणात मांस तसेच शिकार करण्यासाठी लागणारा मुद्देमाल जप्त केला. संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे. गुप्त माहितीच्या आधारे रविवारी (दि. 24 ऑगस्ट) दुपारी दोनच्या सुमारास अंचरवाडी बिटचे रक्षक गजानन पोटे यांनी पथकासह धाड घातली. या कारवाईत घटनास्थळी एक काळवीट बांधून ठेवलेले होत