तालुक्यातील हिवरा (अंतरगाव) गावातील एका व्यक्तीने दारूच्या नशेत अंगावर धावून जाऊन शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याची घटना ता. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी कैलास फकिराजी उरकुडे (वय 55, रा. हिवरा) यांनी गजानन बाबाराव सातपुते (रा. हिवरा) याच्या विरोधात सायंकाळी 5.45 वाजता सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती ता. 7 ला सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.